Mobile Attracts Lightning

Posted On 13-December-2018 12:45 AM IST
Mobile Attracts Lightning

आजकल एक message येत आहे की मोबाईलवर बोलल्यानेच किंवा वीजा गड़गड़त असताना मोबाइल सुरु ठेवल्याने मोबाईल वर वीज पडते आणि ही अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे . पण एबीपी माझानं या बातमीची पडताळणी केली, तेव्हा मोबाईलचा आणि वीज कोसळण्याचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. केवळ जुने फोन आणि लँडलाईन फोनला वीज कोसळण्याचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मोबाइल फोन हे कमी पॉवर डिव्हाइसेस आहेत आणि त्यांच्यात काही वैशिष्ट्ये नाहीत ज्या त्यांना विजेसाठी आकर्षित करतात.

विज फ़क्त जड़ व उंचीने मोठ्या असलेल्या वस्तूना फ़क्त attract करते

विजा कोसळताना काय काळजी घ्याल?

*विजा कोसळताना झाडाखाली थांबू नये

*पाण्याजवळही थांबू नये

*घरात असाल, तर अंगणात पहार किंवा लोखंडी वस्तू टाकावी

*शेतात असाल, तर पायाखाली लाकूड किंवा पाला ठेवावा

*टीव्ही, कॉम्प्युटर बंद करावे

*इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग काढून ठेवावेत

*विद्युत प्रवाही वस्तूंपासून कटाक्षाने लांब राहावे

वेळ वाईट असली, की माणसाला कुणीही वाचवू शकत नाही हे खरंय, पण अशातही आपण थोडी खबरदारी घेतली, तर वेळेला चकवाही देऊ शकतो. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर खाली दिलेली लिंक कींवा Video ओपन करा

व्हायरल सत्य : मृत्यूचं कारण - वीज पडून की मोबाईलमुळे?ABP माझा